मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची माहिती केंद्रीय वित्त विभागाला देणार – सोमय्या

मी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची रितसर चौकशी व्हावी अशी मागणी केली. उद्या याचसंदर्भात मी दिल्लीला जाणार असल्याचं सोमय्यांनी सांगितले. हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास निधीमध्ये जो घोटाळा केला आहे, त्याबाबत केंद्रीय वित्त विभागाला माहीती देणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटले.

    मुंबई : माजी खासदार आणि भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफ आणि भावना गवळी यांच्या घोटाळ्यांचा पाढा वाचत त्यांच्यावर आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टिका केली. मी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची रितसर चौकशी व्हावी अशी मागणी केली. उद्या याचसंदर्भात मी दिल्लीला जाणार असल्याचं सोमय्यांनी सांगितले.  राज्यपाल यांची भेट घेत मी हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही घोटाळ्याची माहीती दिली आणि योग्य चौकशी करावी अशी विनंती केली. राज्यपालांनी मला आश्वासन दिलं आहे की, याबाबत योग्य ती रितसर चौकशी केली जाईल. याबाबत मी उदया दिल्लीला जात आहे, त्यात तीन विषय आहेत.

    एक म्हणजे हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास निधीमध्ये जो घोटाळा केला आहे, त्याबाबत केंद्रीय वित्त विभागाला माहीती देणार. दुसरे म्हणजे मुंबईचे सहाय्यक आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदोशानुसार पोलिसांनी १९ सप्टेंबरला ठाकरे सरकराचे माफिया म्हणून काम केले. त्याची मी मानवधिकार दिल्ली येथे तक्रार दाखल करणार. कारण पोलिसांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि नांगरे-पाटील यांनी मला मुलुंड येथील घरी ६ तास कोंडून ठेवल होत. त्यानंतर सीएसएमटी स्थानकाला रोखल गेल. हे सर्व करत असताना पोलिसांकडे कोणतीही ॲार्डर नव्हती. आणि तिसरं म्हणजे भावना गवळी यांनी १०० कोटीचा घोटाळा केला हे सिद्ध झाले आहे. कारण भावना गवळी यांचे सहकारी शहीद खान यांना पोलिसांनी अटक केली. त्या ॲार्डरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की, भावना गवळी यांनी ७ कोटींची चोरी केली. १७ कोटी रूपये लंपास केले. हे पुरावे ईडीकडे आहेत त्याच प्रमाणे माझ्याकडे पण आहेत. त्यांच्या पतसंस्थेत बोगस एन्ट्री आहे. भावना गवळी यांची अटक करावी, यासंदर्भात मी मागणी करणार आहे. कारण माझ्यावरील हल्ला भावना गवळी यांच्यामुळे करण्यात आला होता.

    दरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री अनिल परब, यांनीही घोटाळा केला असल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत, सोमय्या यांनी जोरदार टिका केली. महाविकास आघाडी सरकारने आणि विशेष करुन शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी अनिल देशमुख यांना पाठीशी न घालता त्यांना ईडीकडे सुपूर्द करावं. या सर्व घोटाळ्याबाजांना पाठीशी घालण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत का? असा प्रश्न सुद्धा सोमय्या यांनी उपस्थित केला. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुले आव्हान आहे की, जर का मी दोषी असेन तर माझ्यावर कारवाई करा, नाहीतर तुमच्या सरकारमधील कोणी भ्रष्ट असतील त्यांच्यावर तरी कारवाई करा असा इशारा पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी दिला.