‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर

अंबानी स्फोटके आणि मनसूख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात गजाआड गेलेला एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा व अन्य पोलीस अधिकाऱ्यांचा वसूली एजेंट म्हणून माझ्या पतीने अनेक वर्षे काम केले आहे. या अधिकाऱ्यांचे कोट्यवधी रुपये तो सांभाळत होता. त्यांची सर्व वसुली तोच करत होता, असा आरोप गुंजन शर्मा या मुंबईतील महिलेने केला आहे. तिने याबाबत काल एनआयएच्या कार्यालयात जाऊन माहिती दिली आहे.

    मुंबई : अंबानी स्फोटके आणि मनसूख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात गजाआड गेलेला एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा व अन्य पोलीस अधिकाऱ्यांचा वसूली एजेंट म्हणून माझ्या पतीने अनेक वर्षे काम केले आहे. या अधिकाऱ्यांचे कोट्यवधी रुपये तो सांभाळत होता. त्यांची सर्व वसुली तोच करत होता, असा आरोप गुंजन शर्मा या मुंबईतील महिलेने केला आहे. तिने याबाबत काल एनआयएच्या कार्यालयात जाऊन माहिती दिली आहे.

    अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रमूख सुत्रधार म्हणून अटकेत असणाऱ्या सचिन वाझेसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. दोन्ही प्रकरणात त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर एनआयएने त्यांची कोठडीत रवानगी केली आहे.

    वसुली एजेंट

    ‘माझा पती अनिल सिंह हा प्रदीप शर्मा आणि बच्ची सिंह यांच्या जवळचा होता. त्यांचे सर्व अवैध व्यवहार तो बघायचा. त्यामुळे गैरमार्गातून आलेले त्यांचे कोट्यवधी रुपये तो सांभाळत होता. अनिल सिंह हा प्रदीप शर्माचा वसूली एजंट होता,’ असा आरोप गुंजन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. गंुजन यांचा आपल्या पतीसोबत वाद असून पतीविरुध्द त्यांनी यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.

    शर्मा यांना वकिलांना भेटता येणार

    शर्मा यांना एनआयए कोर्टाने 28 जूनपर्यंत कोठडी दिली आहे. दरम्यान वकिलास भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून शर्मा यांनी एनआयए कोर्टात अर्ज सादर केला होता. यावर सोमवारी सुनावणी झाली असून कोर्टाने शर्मा यांना त्यांच्या वकिलांना दररोज दुपारी 12 ते 12.20 असा 20 मिनिटांचा वेळ कोर्टाकडून देण्यात आला आहे.

    हे सुद्धा वाचा