ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये, नाना पटोले यांचा सल्ला…

युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का असा उल्लेख केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये इतकाच आमचा सल्ला आहे,असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युपीए विकलांग झाल्याचं दिल्लीत म्हणाले आहेत. तसेच युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून टीका केली आहे.

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का असा उल्लेख केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये इतकाच आमचा सल्ला आहे,असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त असून याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटल्याची चर्चा सुरु आहे.