युपीएच्या अध्यक्ष पदावरून राज्यात गोंधळ, आमच्या नेत्यांवर टीका करायची असेल तर मग आम्हालाही विचार करावा लागणार ; नाना पटोले यांचा संजय राऊतांना सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात बोलणार आहे. जर आमच्या नेत्यांवर टीका करायची असेल तर मग आम्हालाही विचार करावा लागणार हे आम्ही निश्चितपणे त्यांना ठणकावून सांगणार आहे. आमच्यामुळे सरकार आहे आम्ही सरकार नाही हे पहिल्या दिवशी सांगितलं आहे. ज्या पवार साहेबांची येथे वकिली करत आहेत ती वकिली त्यांनी थांबवावी, असा सल्ला पटोले यांनी राऊतांना दिला आहे.

    मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चर्चाना उधाण आले आहे. युपीएचे अध्यक्ष पद शरद पवार यांना देण्यात यावं असं संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवार शिवसेनेत की राष्ट्रवादीत आहेत हे तपासण्याची गरज असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी राऊतांना चांगलाच टोला लगावला आहे.

    संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहे हे आम्हाला माहिती आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, सामना पेपरचे संपादक आहेत हे आम्हाला माहित आहे. परंतु अलीकडच्या काळात आम्हाला त्यांचे नवे रूप पाहायला मिळत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते किंवा शरद पवारांचे प्रवक्त्यासारखे ते वागत आहेत. त्यामुळे हे योग्य नाही. जे या युपीएचा हिस्साच नाही. त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये, अशी खोचक टीका देखील नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.