महाराष्ट्रात मार्चपर्यंत भाजपचे सरकार स्थापन होईल नारायण राणेंचा दावा! राजकीय चर्चांना उधाण

मार्चपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि येथे भाजपचे सरकार स्थापन होईल, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे सरकार आल्यास अपेक्षित बदल दिसेल असे ते म्हणाले. दरम्यान ते म्हणाले की, ही गोष्ट माझ्या आत आहे, त्यामुळे मला ती आता बाहेर काढायची नाही. सरकार बनवायचे असेल किंवा सरकार पाडायचे असेल तर काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात.

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. मार्चपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि येथे भाजपचे सरकार स्थापन होईल, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे सरकार आल्यास अपेक्षित बदल दिसेल असे ते म्हणाले. दरम्यान ते म्हणाले की, ही गोष्ट माझ्या आत आहे, त्यामुळे मला ती आता बाहेर काढायची नाही. सरकार बनवायचे असेल किंवा सरकार पाडायचे असेल तर काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात.

    महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव घेत ते म्हणाले की, त्यांनी मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन करण्याचे बोलले आहे आणि ते खरे करून दाखवण्याचे काम आम्ही करू. त्याचवेळी ते उद्धव ठाकरेंबद्दल म्हणाले की, त्यांची तब्येत खराब आहे, त्यामुळे मला भाष्य करायचे नाही, मात्र युतीचे सरकार फार काळ टिकणार नाही. असं नारायण राणे म्हणाले आहेत.

    भेटीगाठी आणि राजकीय घडामोडींना वेग
    दरम्यान काल प्रेदशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. तर आज शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची एकत्रित बैठक होत आहे. त्यामुळं या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होते आणि ही बैठक कोणत्या कारणासाठी होत आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यामुळं या वाढता भेटीगाठी आणि बैठकांमुळ राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सत्ताबदल होणार का? नवीन सरकार येणार का? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.