नारायण राणेंनी घेतली शरद पवारांची भेट, केली विचारपूस, राणे-पवार नात्यामागचं रहस्य

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच शरद पवार यांची सहकुटुंब भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नारायण राणेंसोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र आमदार नितेश राणेदेखील होते. पवार आणि राणे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे संबंध या भेटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या भेटीसाठी सरसावले आहेत. पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची ख्यालीखुलाशी जाणून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील आणि पक्षातील व्यक्ती त्यांची विचारपूस करण्यासाठी ब्रिच कँडी रुग्णालयात जात आहेत.

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच शरद पवार यांची सहकुटुंब भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नारायण राणेंसोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र आमदार नितेश राणेदेखील होते. पवार आणि राणे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे संबंध या भेटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

    विरोधी पक्षात असूनदेखील नारायण राणे हे कधीही शरद पवारांवर वैयक्तिक टीका करताना दिसत नाहीत. आपले वैचारिक मतभेद असले तरी पवारांवर आपण कधीही टीका करणार नाही, असं राणे जाहीरपणे सांगत असतात. नारायण राणेंच्या आत्मचरित्राच्या कार्यक्रमाला देखील शरद पवारांनाच त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. तर दोन्ही कुटुंबातील कौटुंबिक कार्यक्रमांना दोन्ही कुटुंबातील सदस्यांची वारंवार उपस्थिती असलेलं महाराष्ट्रानं वारंवार पाहिलं आहे.

    शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते त्यांच्या आवडत्या कामात व्यस्त असल्याचं त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. गेल्या आठवड्यात पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. सर्व चाचण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असून शस्त्रक्रियेची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानुसार इतर सर्व कार्यक्रम रद्द करत पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.