नाशिक, पालघरला भूकंपाचे सौम्य धक्के

नाशिक आणि पालघर जिल्ह्याला गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. नाशिकच्या पश्चिमेस 95 किमी अंतरावर 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गुरुवारी दुपारी 2 वाजून 28 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याची माहिती दिली आहे.

    मुंबई : नाशिक आणि पालघर जिल्ह्याला गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. नाशिकच्या पश्चिमेस 95 किमी अंतरावर 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गुरुवारी दुपारी 2 वाजून 28 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याची माहिती दिली आहे.

    पालघर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी भूकंपामुळे जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले.

    मुंबईपासून सुमारे 110 किमी दूर स्थित पालघर जिल्ह्यातील काही भागात नोव्हेंबर 2018 पासून अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.