नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव द्यावे; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नवी मुंबई विमानतळ हे एक्स्टेन्शन असल्याने, त्या विमानतळाला छत्रपती शिवरायांचेच नव संयुक्तिक असेल असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेचं बाहेरुन येणारा कोणताही माणूस, हा राज्यात म्हणजे छत्रपतींच्या भूमीत येतो, त्यामुळे शिवरायांचेच नाव योग्य असेल, असे राज यांचे म्हणणे आहे. हा विमानतळ लवकर कसा मार्गी लागेल, याकडे सरकारने लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

  मुंबई : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे. तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे. त्यात कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्यानं बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर आज नवी मुंबईचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि महेश बालदी आज मुंबईत ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांची भाट घेतली.

  दरम्यान भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केलेली आहे. तर शिवसेनेनं बाळासाहेबांचं नाव देण्यावर ठाम भूमिका घेतल्यानं वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरुन प्रशांत ठाकुर आज राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वादावर मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.

  राज ठाकरे काय म्हणाले ?

  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नवी मुंबई विमानतळ हे एक्स्टेन्शन असल्याने, त्या विमानतळाला छत्रपती शिवरायांचेच नव संयुक्तिक असेल असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेचं बाहेरुन येणारा कोणताही माणूस, हा राज्यात म्हणजे छत्रपतींच्या भूमीत येतो, त्यामुळे शिवरायांचेच नाव योग्य असेल, असे राज यांचे म्हणणे आहे. हा विमानतळ लवकर कसा मार्गी लागेल, याकडे सरकारने लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान नावावरुन वाद करण्यात काहीही अर्थ नाही. मात्र त्यातच आपल्याकडील अनेकांना स्वारस्य असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. छत्रपतींचे नाव असेल, तर इतर कुठलेही नाव समोर येणार नाही आणि वाद होणार नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले.

  दरम्यान राज यांच्या या भूमिकेचे भाजपनेही स्वागत केले असून आता या प्रकरणात सरकार आणि शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  कृती समितीच्या ठरावाला मुख्यमंत्र्यांनी दिली बगल

  लोकनेते दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत दिबांच्या नावाला पाठिंबा दर्शविणारे स्थानिक ग्रामपंचायती तसेच विविध प्राधिकरणाचे ठराव मुख्यमंत्र्याना सादर केले होते. या ठरावांची देखील दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. विशेष म्हणजे तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतल्यास शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरतील अशी भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याने अशाप्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकुर यांनी केला आहे. कृती समितीच्या माध्यमातुन येत्या २४ तारखेला सिडकोला घेराव घालण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.