Navy personnel disappear from sea; The submarine had sailed to America

मुंबई : सोमालियन समुद्री दरोडेखोरांच्या तावडीत सापडलेल्या जहाजाची तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सुटका केली होती. आता त्याच जहाजाचा क्वार्टर मास्टर गेल्या १६ दिवसांपासून बेपत्ता आहे. प्रशांत महासागराच्या समुद्री मार्गे जहाज अमेरिकला जात होते. यादरम्यान ते बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या कुटुंबांनी पंतप्रधान  आणि परराष्ट्रमंत्र्यांना मदतीचे साकडे घातले आहे.

मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असणारे २७ वर्षीय अरविंद तिवारी हे मुंबईच्या एलिगेंट फ्लीट मॅनेजमेंट कंपनीत क्वार्टर मास्टर म्हणून काम करत होते. ते पाणबुडीतून अमेरिकेला गेले होते.

पनामा फ्लॅगच्या पाणबुडीसह प्रशांत महासागरात प्रवास करताना ३ डिसंेबरला टेक्सास येथील आर्थर पोर्टजवळ ते समुद्रात पडले. या घटनेची माहिती मात्र एलिगेंट फ्लीट मॅनेजमेंट कंपनीने केवळ एका पत्राने त्यांच्या कुटुंबियांना कळवली. पोर्टवर पोहचण्यापूर्वी लॅडर रिंगिंग प्रक्रियादरम्यान समुद्रात उंच लाटा उसळल्यामुुळे अरविंद समुद्रात पडले असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पत्रात म्हटले आहे.

अरविंदच्या कुटुंबियांनी कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप ठेवला आहे. कामादरम्यान सुरक्षेसंबंधी बाबींवर लक्ष का ठेवले नाही? असा सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.

अरविंद यांच्या वडिलांनी सांिगतले की, सेफ्टी हार्नेस जे की एकप्रकारी रश्शी असते, त्याला हुक लावलेला असतो आणि त्यामुळे खाली पडण्यापासून सुरक्षा मिळते, याचा वापर शिपवर का नाही करण्यात आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच तो पडल्यानंतर तातडीने सर्च ऑपरेशन का नाही घेतले, हा कंपनीचा हलगर्जीपणा आहे, असा आरोप त्यांनी केला.

अरविंद तिवारीच्या कुटुंबांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्यटनमंत्री एस. जयशंकर, नौका परिवहन आणि जलमार्गमंत्री नितीन गडकरी यांना ट्विट करून मदतीचे साकडे घातले आहे.

२०१३ मध्ये झाले होते अपहरण

२०१३ मध्ये सोमलियन समुद्री लुटारूंनी एक जहाजाचे अपहरण केले होते. त्या जहाजावर अरविंद तिवारी देखील उपस्िथत होता. लुटारूंनी ते जहाज विना परवाना ईरानाच्या हद्दीत नेले होते. जहाजामधील लोकांना इरानच्या पोर्टवरच राहावे लागले आणि त्यांची परिस्थिती एका बंधकांप्रमाणेच झाली होती. इरानच्या नौदलाने जहाज पकडले होते. त्यानंतर २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याची दखल घेतली आणि अरविंद तिवारी यांची सुटका केली होती.