मलिकांचं दरेकरांना ओपन चॅलेंज, मलिक म्हणतायत ‘आ देखें ज़रा किसमें कितना है दम’

मलिक म्हणाले की, “आमच्या वकिलांनी मोहित कंबोज यांचा ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरणही न्यायालयासमोर ठेवलं आहे. तसेच त्यांच्यावरील सीबीआय छाप्यांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाव बदलून आपली ओळख लपवली आहे. आधी नाव मोहित कंबोज होते, मात्र घोटाळा समोर यायला सुरुवात झाल्यावर त्यांनी स्वतःचं नाव मोहित भारतीय ठेवलं. आम्ही या सर्व गोष्टी न्यायालयाच्या समोर मांडल्यात,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं. दरेकरांच्या या ट्विटला मलिक यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. ‘आ देखें ज़रा किसमें कितना है दम’ असं ओपन चॅलेंजच नवाब मलिक यांनी दिलं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत हे चॅलेंज दिलं आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये प्रवीण दरेकर यांनाही टॅग केलं आहे.

    मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिकांवर 1,000 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली.

    दरेकरांच्या या ट्विटला मलिक यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. ‘आ देखें ज़रा किसमें कितना है दम’ असं ओपन चॅलेंजच नवाब मलिक यांनी दिलं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत हे चॅलेंज दिलं आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये प्रवीण दरेकर यांनाही टॅग केलं आहे.

    या संदर्भात बोलताना प्रविण दरेकर म्हणाले होते की, “महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला फारशी किंमत दिली जात नाही. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भात फारसा बेस नाही. काँग्रेसबद्द्ल विदर्भातील लोकांच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून विदर्भात अधिवेशन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात १ हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.”

    तर, यावर मलिक म्हणाले की, “आमच्या वकिलांनी मोहित कंबोज यांचा ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरणही न्यायालयासमोर ठेवलं आहे. तसेच त्यांच्यावरील सीबीआय छाप्यांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाव बदलून आपली ओळख लपवली आहे. आधी नाव मोहित कंबोज होते, मात्र घोटाळा समोर यायला सुरुवात झाल्यावर त्यांनी स्वतःचं नाव मोहित भारतीय ठेवलं. आम्ही या सर्व गोष्टी न्यायालयाच्या समोर मांडल्यात,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

    दरम्यान, मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी मलिक यांनी अनेक आरोप केले होते. त्यात त्यांनी मोहित कंबोज आणि त्यांच्या मेहुण्यावरही काही आरोप केले होते. या आरोपांमुळे माझी आणि माझ्या मेव्हण्याची बदनामी झाल्याचा दावा कंबोज यांनी करत मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे.