ड्रग पेडलर शादाब बटाटाला पकडण्यात एनसीबीला आले यश, २ कोटी रुपयांचं ड्रग्ज घेतलं ताब्यात

अंमली पदार्थ विरोधी पथकाने(NCB ) गुरुवारी रात्री एक कारवाई केली.(NCB action in Mumbai) या धडक कारवाईत मुंबईतील परदेशी ड्रग्जचा सर्वात मोठा सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला (shadab batata arrested)पकडण्यात एनसीबीला यश आले आहे.

    अभिनेता सुशांत सिंह राजपूत(sushant singh rajput case) प्रकरणापासून बॉलिवूड ड्रग कनेक्शन पुन्हा उजेडात आले. अजूनही यात अनेकांची नावे समोर येत आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाने(NCB ) गुरुवारी रात्री एक कारवाई केली. या धडक कारवाईत मुंबईतील परदेशी ड्रग्जचा सर्वात मोठा सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला पकडण्यात एनसीबीला यश आले आहे.

    एनसीबीनं शादाबकडून तब्बल २ कोटी रुपयांचं ड्रग्ज हस्तगत केलं आहे. शादाब बटाटा हा गेल्या कित्येक वर्षांपासून ड्रग्जच्या व्यवहारात सक्रिय होता. बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींना शादाब बटाटा ड्रग्ज पुरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    आत्तापर्यंत सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींची नावं ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहे. त्यामुळे एनसीबीनं अधिक खोलात तपास सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एनसीबीनं गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये फारूकचा मुलगा शादाब एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

    एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड या भागांमध्ये मारलेल्या छाप्यांमध्ये २ कोटी रुपये किंमतीचं MDMA ड्रग्ज सापडलं आहे. त्यासोबतच, काही महागड्या कारदेखील हस्तगत केल्या आहेत. याशिवाय छाप्यामध्ये एक नोटा मोजण्याचं मशिन सापडलं आहे.

    MDMA सोबतच फारूख बटाटा एलएसडी, गांजा, बड आणि कोकेनसारखं ड्रग्ज देखील पुरवायचा अशी माहिती एनसीबीला मिळाली आहे. गुरुवारी दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाण याच्या डोंगरी आणि नागपाडा भागातल्या ठिकाणांवर एनसीबीनं छापे मारले.