Corona's terror at the house of the infamous Don, the death of a nearby 'this' person

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची ड्रग्स आणि टेरर फंडिंग प्रकरणी तब्बल 7 तास चौकशी केली. अमली पदार्थांच्या पुरवठ्यासंदर्भात त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी इक्बाल कासकरला भारत आणि पाकिस्तान सीमेचा नकाशा दाखवून अनंतनागमार्गे सीमा ओलांडून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या मार्गाबाबतही विचारणा करण्यात आली. यावेळी एनसीबीने शब्बीर उस्मान शेख आणि इक्बाल कासकर यांची समोरासमोर चौकशी केली.

    मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची ड्रग्स आणि टेरर फंडिंग प्रकरणी तब्बल 7 तास चौकशी केली. अमली पदार्थांच्या पुरवठ्यासंदर्भात त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी इक्बाल कासकरला भारत आणि पाकिस्तान सीमेचा नकाशा दाखवून अनंतनागमार्गे सीमा ओलांडून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या मार्गाबाबतही विचारणा करण्यात आली. यावेळी एनसीबीने शब्बीर उस्मान शेख आणि इक्बाल कासकर यांची समोरासमोर चौकशी केली.

    शब्बीर उस्मान शेख हा जम्मू-काश्मीरमार्गे सीमेपलीकडून चरस तस्करीतील मुख्य आरोपी आहे. शब्बीर हा इक्बाल कासकरचा जुना मित्र आहे. इक्बाल कासकरला 2003 मध्ये दुबईहून भारतात हद्दपार करण्यात आले होते. त्यावेळी शब्बीर हा इक्बाल कासकरसोबत डी-कंपनीच्या खंडणी व ड्रग्स व्यावसायात सक्रिय होता. त्यावेळी शब्बीर हा कासकरचा खास माणूस होता.

    त्याचबरोबर, 2015 मध्ये इक्बाल कासकर आणि शब्बीर शेख यांनी एका रिअल इस्टेट एजंटला 3 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पण त्यानं पैसे न दिल्यानं दोघांनी संबंधित एजंटला बेदम मारहाण केली होती. ज्यामुळे दोघांना अटकही करण्यात आली होती. पण नंतरच्या काळात डी-कंपनीकडून शब्बीरला केवळ ड्रग्सचा व्यवसाय करण्याची जबाबदारी देण्यात आली.