parambeer singh

आता एक पाऊल पुढं जात राष्ट्रवादी काँग्रेसनं परमबीर यांच्यावर टीका करायला सुरुवात केलीय. परमबीर सिंग यांनी गोळा केलेली संपत्ती पाहून त्यांचं केवळ नाव परमबीर आहे, मात्र त्यांची वृत्ती बकासुराची आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलीय. #Parambeerexposed हा हॅशटॅग वापरून केलेल्या ट्विटरमध्ये त्यांनी परमबीर सिंग यांच्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडलाय.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवून केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं परमबीर सिंग यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केलीय. पोलीस आय़ुक्त पदावरून बदली केल्याच्या रागातूनच परमबीर सिंग असे उलटसुलट आरोप करत असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला होता.

    आता एक पाऊल पुढं जात राष्ट्रवादी काँग्रेसनं परमबीर यांच्यावर टीका करायला सुरुवात केलीय. परमबीर सिंग यांनी गोळा केलेली संपत्ती पाहून त्यांचं केवळ नाव परमबीर आहे, मात्र त्यांची वृत्ती बकासुराची आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलीय. #Parambeerexposed हा हॅशटॅग वापरून केलेल्या ट्विटरमध्ये त्यांनी परमबीर सिंग यांच्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडलाय.

    रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्विटनुसार परमबीर यांच्या मालकीचे मुंबईत दोन प्लॅट आहेत. या प्रत्येक फ्लॅटची किंमत २ कोटी रुपये आहे. तर हरियाणातील त्यांच्या गावी ४ कोटी रुपये किंमतीचं घर असल्याची माहिती आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे मुंबई आणि हरियाणात कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

    अंधेरीतील वसुंधरा सोसायटीमध्ये २००३ साली त्यांनी घेतलेल्या फ्लॅटची किंमत होती ४८.७५ लाख रुपये. तर २००७ साली नेरळमध्ये त्यांनी ३.६० कोटी रुपये किंमतीचा आणखी एक फ्लॅट घेतला होता. तर २०१९ साली त्यांनी हरिणायात १४ लाख रुपयांची जमीन खरेदी केली, तर हरिणायातल्या घराची किंमत ४ कोटी रुपये असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिलीय.