NCP jumps into Mamata Banerjee and BJP controversy; Sharad Pawar to visit West Bengal

कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांच्या बदल्या करत आहे. हा विषय गंभीर असून याबाबत ममता बॅनर्जी व शरद पवार यांची चर्चा झाली आहे.  येत्या काही दिवसात सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा शरद प्रयत्न पवार आणि ममता बॅनर्जी करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगीतले.

मुंबई : बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड खालसा करण्यासाठी भाजपाने मास्टर प्लानच बनवल्याचे दिसत आहे. ममता बॅनर्जी आणि भाजपच्या वादात आता राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. ममता बॅनर्जी व शरद पवार यांची चर्चा झाली असून गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये शरद पवार जातील अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

केंद्र सरकारच्या मदतीने भाजप राज्यसरकारच्या अधिकाराचे हनन करत आहे. इतकचं नाही तर श्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.