
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. पाच दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते(NCP leader targeted by Kirit Somaiya; Complaint to ED making serious allegations against Dhananjay Munde).
मुंबई: भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. पाच दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते(NCP leader targeted by Kirit Somaiya; Complaint to ED making serious allegations against Dhananjay Munde).
धनंजय मुंडे यांनी मृत व्यक्तीचे अंगठे घेऊन कारखान्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आता सोमय्या यांनी मुंडे यांच्याविरोधात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, एफआयआरच्या पाठपुराव्यासाठी सोमय्या गुरुवारी बीड जिल्ह्यातील जगमित्र शुगर आणि बर्दापूर पोलिस स्टेशनला भेट देणार आहेत. सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात धनंजय मुंडे आणि जगमित्र शुगर मिल्स लि. विरुद्ध बर्दापूर पोलीस स्टेशन, बीड येथे नोंदवलेली एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली एसएलपी नाकारली होती.
या सर्व प्रकरणात 25 कोटींहून अधिकची फसवणूक झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्याशिवाय हजारो शेतकरी, भागधारक, सरकार, शेतकऱ्यांसह देवस्थानच्या जमिनी बळकावळ्याचाही आरोप सोमय्या यांनी मुंडे यांच्यावर केला आहे.