भाजपाने कितीही प्रयत्न केले तरीही… अखेर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली

राज्यातील सत्ताधारी पक्षांना येणाऱ्या ईडीच्या नोटीसा म्हणजे केंद्राकडून होणारा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.  ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्य नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं असा पवारांनी सांगीतले.

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपा कधीच यशस्वी होणार नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच असेही पवार म्हणाले. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. ईडीच्या नोटीसांवरुनही शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षांना येणाऱ्या ईडीच्या नोटीसा म्हणजे केंद्राकडून होणारा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.  ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्य नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं असा पवारांनी सांगीतले.

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं आहे. सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीही प्रयत्न करणार नाही हे सरकार अंतर्विरोधाने पडेल अशी टीका भाजपच्या नेत्यांकडून वारंवार केली जात आहे.
महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षांसाठी स्थिर आहे. सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही असा टोला पवारांनी लगावला.