NCP Shiv Sena's masterstroke in Mumbai Bank's presidential election; Defeat of BJP's Prasad Lad

मुंबई बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले आहे. गुरुवारी अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी भाजपाचे प्रसाद लाड यांचा पराभव केला. या निवडणुकीत कांबळे यांचा 11 विरुद्ध 9 मतांनी विजय झाला(NCP Shiv Sena's masterstroke in Mumbai Bank's presidential election; Defeat of BJP's Prasad Lad).

  मुंबई : मुंबई बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले आहे. गुरुवारी अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी भाजपाचे प्रसाद लाड यांचा पराभव केला. या निवडणुकीत कांबळे यांचा 11 विरुद्ध 9 मतांनी विजय झाला(NCP Shiv Sena’s masterstroke in Mumbai Bank’s presidential election; Defeat of BJP’s Prasad Lad).

  अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कांबळे आणि भाजपाकडून लाड तर तर उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर तर भाजपाकडून विठ्ठल भोसले यांचा अर्ज दाखल झाला होता. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत समान मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात उपाध्यक्ष पद विठ्ठल भोसले यांच्याकडे गेले.

  दरेकर पायउतार

  बँकेच्या अध्यक्ष पदावरुन भाजपाच्या प्रविण दरेकरांना धक्का देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र व्यूहरचना आखली होती. गेली सात वर्षे दरेकर या बँकेचे अध्यक्ष होते. या पराभवामुळे दरेकर यांना अध्यक्षपदावरून पाय उतार व्हावे लागले आहे.

  राष्ट्रवादी शिवसेनेचे मास्टरस्ट्रोक

  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे त्यांची सदस्य संख्या 11 झाली तर भाजपाकडे 9 संचालक होते. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचा पराभव अटळ होता. पराभव दिसताच दरेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत प्रसाद लाड यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा हा मास्टरस्ट्रोक चांगलाच यशस्वी ठरला.

  उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीचे एक मत फुटले

  उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपाचे विठ्ठल भोसले यांना समान म्हणजे प्रत्येकी 10 मते मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीचे एक मत फुटल्याचे स्पष्ट झाले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022