गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार, प्रफुल पटेलांची माहिती 

आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत, दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गोव्यासाठी वेगळा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे. आम्ही तृणमूल किंवा काँग्रेस सोबत आघाडी करणार नसून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं आहे.

    गोंदिया : आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत, दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गोव्यासाठी वेगळा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे. आम्ही तृणमूल किंवा काँग्रेस सोबत आघाडी करणार नसून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं आहे. पटेल यांनी उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीसंदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लॅन देखील सांगितला. तसेच गोव्यासह उत्तर प्रदेश आणि मणिपरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी कॉग्रेस निवडणूक लढवणार आहे.

    दरम्यान, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडी केली असून पहिल्या टप्प्यात एक जागा लढवणार असून पुढच्या टप्प्यातील माहिती लवकरचं कळेल, असं पटेल म्हणाले. प्रफुल पटेल यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं सांगितल्यानं आता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस सोबत युती करण्याच्या आशा मावळल्या असल्याचं दिसून येत आहे. तसेच गोव्यासह उत्तर प्रदेश आणि मणिपरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी कॉग्रेस निवडणूक लढवणार आहे.

    पुढे बोलताना पटेल म्हणाले की, गोवा राज्यात होणारी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रसार माध्यमांसमोर त्यांनी ही घोषणा केलीय. गोव्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच तृणमूल काँग्रेस मध्ये युती करीत लढणार असल्याचे चिन्ह दिसत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने लढणायची तयारी केली आहे. तर, काही ठिकाणी शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती करुन लढणार असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे. त्यानंतर तीन राज्यातील निवडणुकीसाठी आम्ही काही नियोजन केले असल्याचे सुद्धा पटेलांनी सांगितले.