New Covid variant Omicron: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका; लॉकडाऊनबाबात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मोठा खुलासा

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या. त्यानंतर  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र  लिहिले असून. ३० नोव्हेंबर रोजी राज्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सवाल उपस्थित केल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनबाबात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मोठा खुलासा केला आहे(New Covid variant Omicron: Danger of the new Corona variant; Health Minister Rajesh Tope's big revelation about lockdown).

  मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या. त्यानंतर  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र  लिहिले असून. ३० नोव्हेंबर रोजी राज्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सवाल उपस्थित केल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनबाबात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मोठा खुलासा केला आहे(New Covid variant Omicron: Danger of the new Corona variant; Health Minister Rajesh Tope’s big revelation about lockdown).

  इतर राज्याच्या गाईडलाईन्सशी साधर्म नाही

  राज्य मंत्रिमंडळाने तातडीच्या बैठकीनंतर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्यानंतर  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र  पाठवून ३० नोव्हेंबरच्या मार्गदर्शक सूचनांवर सवाल उपस्थित केला आहे की, राज्याच्या मार्गदर्शक सूचनाचे इतर राज्याच्या गाईडलाईन्सशी साधर्म नाही. यामध्ये विमानतळावर डोमेस्टिक प्रवाशांकरता ७२ तासांपर्यंतचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.

  यापूर्वी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागत होते. मात्र आता मुंबई विमानतळावर ७२ तासांपर्यंतचा कोविड निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे सक्तीचे आहे.  रिपोर्ट नसल्यास विमानतळावर कोविड टेस्ट केली जाणार आहे. यापूर्वीच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार, साऊथ आफ्रिका, रिस्क कंट्रीमधून येणा-या प्रवाशांचे सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि त्यानंतर १४ दिवस होम आयसोलेशन असणार आहे.

  राज्यांतर्गत विमान प्रवाशांना चाचणी बंधन नाही

  मात्र केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातील अन्य राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना दोन डोस घेतलेले असताना RTPCR चाचणी बंधनकारक असणार नाही असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात बोलताना केला आहे. राज्यात पहिल्या डोसच  ८२ टक्के तर दुसऱ्या डोसचे ४४ टक्के लसीकरण झाले आहे. साडेसात कोटी लोकांना पहिला डोस दिला असून साडेचार कोटी लोकांना दुसरा डोस दिला आहे. राज्यात टाळेबंदी लावण्यासारखे कोणतेही कारण  सध्या नाही,त्यामुळे राज्यात टाळेबंदी लावली जाणार नाही असाही खुलासा त्यांनी केला आहे.