Uddhav Thackeray's statement is indecent to the Chief Minister

 

मुंबई : नवे वर्ष मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महत्वाचे असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी आणि व्यहरचना या वर्षात करणार आहेत. राजकीय पक्ष आता नव्या वर्षात उमेदीने कामाला कामाला लागण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करून काँग्रेसने कात टाकली आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाचे रवी राजा हे विरोधी पक्ष नेते आहेत. सद्या विरोधी पक्षनेते म्हणून सत्ताधाऱयांवर त्यांचा अंकुश आहे. मात्र विरोधक म्हणून पालिकेत तितकासा प्रभावी वाटत नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. त्यामुळे काँग्रेसला आता नव्याने उभारी घ्यावी लागणार आहे.

सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पालिकेची निवडणूक एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे मन वळविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मुंबई महापालिकेत हा आघाडीचा फॉर्म्युला तयार झाल्यास भाजपासाठी ते अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस एकला चलो रे च्या पवित्र्यात असल्याचे दिसत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याचे सूतोवाच राष्ट्रवादीने केले आहे. त्यामुळे ही युती झाल्यास ते शिवसेनेसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

बऱ्याच वर्षांची युती तुटल्यामुळे भाजपा आणि सेना हे पालिका निवडणुकीत आमने सामने लढण्याची शक्यता आहे. खरी लढत या दोन पक्षात होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे हे वर्ष निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मोठ्या राजकीय उलाढाली आणि व्यूहरचना होणारे आहे. भाजपा विरुद्ध आघाडी की स्वतंत्र लढतील याविषयी लोकांना कुतूहल आहे.