sachin waze

गुन्हे शाखेचे निलंबित सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेंच्या(sachin waze) वकिलांच्या उपस्थितीशी संबंधित असलेले दोन अर्ज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून (NIA court rejected two applications)लावले आहेत. तसेच ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला वाझेंचे प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे.

    मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी(mukesh ambani) यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणी (mansukh hiren case) अटक करण्यात आलेले, गुन्हे शाखेचे निलंबित सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेंच्या वकिलांच्या उपस्थितीशी संबंधित असलेले दोन अर्ज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावले.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन याच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. त्यानंतर वाझे यांचे तीन अर्ज एनआयए न्यायालयाने फेटाळून लावले होते. मात्र, त्यांना वकिलांना भेटू देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. तसेच त्यांच्या चौकशीदरम्यान वकिलांना तेथे हजर राहण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर वाझे यांनी आता नव्याने अर्ज दाखल केला असून वकिलांशी बोलताना एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

    त्यावर दिलेले आदेश स्पष्ट असल्याने अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही. असे सांगत एनआयए न्यायालयाने वाझेंचा अर्ज फेटाळून लावला. दुसरीकडे, शुक्रवारी सचिन वाझे चौकशीत सहकार्य करत नसल्याचा पुनरूच्चार एनआयएकडून न्यायालयात करण्यात आला आहे. तसेच परवानगी देऊनही वाझेंचे वकील चौकशीच्यावेळी उपस्थित राहत नाहीत आणि वकिल नसल्याने वाझे चौकशीत उत्तर देत नाहीत. त्यामुळे वाझेच्या वकिलांना हजर राहण्याचे निर्देश द्या, कारण अशी तक्रार एनआयएकडून करण्यात आली होती. त्यावर आरोपी उत्तर देत नाही, तो तुमचा प्रश्न असून त्याबाबत न्यायालयाला सांगू नका, असे स्पष्ट करत एनआयएचा न्यायालयाने त्यांचा अर्जही फेटाळून लावला.

    ठाणे सत्र न्यायालयाकडून एटीएसला वाझेंचं प्रॉडक्शन वॉरंट जारी

    दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयात सचिन वाझेंनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणीमध्ये मनसूख हिरेन प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसला या प्रकरणातील चौकशीसाठी सचिन वाझेंची कस्टडी हवी असल्याचे न्यायालयाला सांगितले. एटीएसकडे मनसूख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंविरोधात पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. यात त्यांनी नोंदवलेल्या साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे, कॉल रेकॉर्ड डेटा आणि इतर पुराव्यांचा समावेश आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने एटीएसला वाझेंचे प्रॉडक्शन वॉरंट जारी केले आहे. जामीन अर्जावर ३० मार्चपर्यंत सुनवाणी तहकूब केली.