निक ज्‍युनिअर गँग मार्शल व चेसने त्‍यांच्‍या कॅनाइन मित्रांसाठी आयोजित केली उत्‍साहपूर्ण #PawsomeChristmas पार्टी

  • सुट्टीनिमित्त पॉसम गँगने दाखवली त्‍यांच्‍या आगामी चित्रपटाची झलक आणि मुलांना त्‍यांच्‍या केसाळ सोबतींसह ख्रिसमसचा आनंद साजरा करण्‍यास केले प्रेरित

मुंबई : ख्रिसमस पार्टी करण्‍याचा क्षण आला आहे! सुट्टीची धमाल सुरू करत निकटून्‍स मार्शल व चेसने वर्षातील सर्वात मोठी पार्टी #PawsomeChristmasPawty चे आयोजन केले आणि पाळीव प्राण्‍यांचे पालक व मुलांना त्‍यांच्‍या केसाळ सोबतींसह ख्रिसमसचा आनंद साजरा करण्‍यास परिपूर्ण संधी दिली.

पेफे कॅफे येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या पार्टीमध्‍ये मुलांना अ‍धिक प्रेमाचा आनंद मिळाला आणि त्‍यांनी त्‍याचे पाळीव प्राणी व कॅनाइन्‍ससोबत उत्तम वेळ व्‍यतित केला. या उत्‍साहपूर्ण जल्‍लोषादरम्‍यान आगामी चित्रपट पॉ पॅट्रोल: जेट टू दि रेस्‍क्‍यू’च्‍या झलकने सर्व मुलांचे लक्ष वेधून घेतले. मुलांनी पडद्ययावर याचा आनंद घेण्‍यासोबत त्‍यांचे केसाळ मित्र मार्शल व चेसला जगाचे संरक्षण करताना पाहिले. यानंतर उत्‍साहवर्धक गेम्‍सचे आयोजन करण्‍यात आले, जेथे मुलांनी भरघोस बक्षीसे जिंकली आणि चार पायांच्‍या प्राण्‍यांसोबत धमाल क्षणांचा आनंद घेतला. फक्‍त एवढेच नाही! उत्‍साहवर्धक पार्टी, मित्र व पालकांसोबत संस्‍मरणीय धमाल, बहुप्रतिक्षित भेटवस्‍तू मिळण्‍यासह निक ज्‍युनिअर इंडियामधील पॉ पॅट्रोल गँगने मुले व पालकांच्‍या चेहऱ्यांवर आनंद व हास्‍य आणले.

चित्रपट ‘पॉ पॅट्रोल: जेट टू दि रेस्‍क्‍यू’ रॉयल किल्‍ल्‍यामधील शक्तिशाली रत्‍न चोरणा-या फ्लॅपिंग्टन्‍सच्‍या योजनाबद्ध ड्यूकच्‍या अवतीभोवती फिरतो. यामध्‍ये पॉ पॅट्रोलची उच्‍चवर्धक साहसी कृत्‍ये पाहायला मिळतील. ते स्‍टण्‍ट पायलट, मेयर हमडींजरचे मांजरीचे पिल्‍लू आणि जेक्‍स माऊंटेनमध्‍ये गेलेल्‍या स्‍कायचे संरक्षण करतात. या चित्रपटाचा टेलिव्हिजन प्रिमिअर शनिवार २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता निक ज्‍युनिअर इंडियावर प्रसारित होणार आहे.

या संध्‍याकार्यक्रमामध्‍ये केसाळ सोबती निकटून्‍ससोबत पॉसम धमाल करताना आणि नवीन मित्र बनवण्‍यासोबत मुलांनी दिलेल्‍या स्‍वादिष्‍ट मेजवानीचा आस्‍वाद घेताना दिसण्‍यात आले. वर्दळीमुळे सुट्टी कुत्र्यांसाठी त्रासदायक ठरू शकते हे पाहता या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून निक ज्‍युनिअर इंडिया या पप्‍पींना काही करिष्‍माई क्षणांचा आनंद देण्‍यास सज्‍ज आहे.