Crowds at nightclubs in Mumbai; A warning to impose night curfew if not improved

महानगरपालिका क्षेत्रात हा Night Curfew असणार आहे. यामुळे मुंबईबाहेर फिरयला जाण्याचा बेत असणाऱ्यांनाही याचा फटका बसणार आहे. सुटी निमित्ताने अनेक जण मुंबईतच Night Out करतात. अनेक जण समुद्र किनाऱ्यांवर सरत्या वर्षाला निरोप देत नविन वर्षाचे स्वागत करतात. मात्र, संचारबंदीमुळे मुंबईकरांना यंदा थर्टी फस्टला हा अनुभव घेता येणार नाही. ख्रिसमस आणि थर्टी फस्ट निमित्ताने मुंबईत अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट तसेच नाईट कल्बमध्ये विविध पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यंदा मात्र, या लेट नाईट पार्ट्यादेखील रद्द होण्याची शक्यता आहे. रात्री ५ पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी महत्वाची बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे ख्रिसमस आणि थर्टी फस्ट सेलिब्रेशनचे बेत आखणाऱ्यांचा हिरमुस होणार आहे.

ख्रिसमस निमित्ताने अनेक जण व्हेकेशनचे बेत आखतात. तर काही जण Night Out चे प्लॅनिंग करतात. मात्र, हे सगळे बेत Night Curfew मुळे फिस्कटणार आहेत. रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी असल्याने ख्रिसमस आणि थर्टी फस्टच्या पार्ट्यावरही निर्बंध येणार आहेत. रात्री ५ पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे.

महानगरपालिका क्षेत्रात हा Night Curfew असणार आहे. यामुळे मुंबईबाहेर फिरयला जाण्याचा बेत असणाऱ्यांनाही याचा फटका बसणार आहे. सुटी निमित्ताने अनेक जण मुंबईतच Night Out करतात. अनेक जण समुद्र किनाऱ्यांवर सरत्या वर्षाला निरोप देत नविन वर्षाचे स्वागत करतात. मात्र, संचारबंदीमुळे मुंबईकरांना यंदा थर्टी फस्टला हा अनुभव घेता येणार नाही.

ख्रिसमस आणि थर्टी फस्ट निमित्ताने मुंबईत अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट तसेच नाईट कल्बमध्ये विविध पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यंदा मात्र, या लेट नाईट पार्ट्यादेखील रद्द होण्याची शक्यता आहे. तर, हॉटेल व्यावसाईकांडून हॉटेल रात्री उशीरा पर्यंत सुरु ठेवण्याची मागणी होत आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी आता थर्टी फर्स्टच्या निमित्ताने हे संकट पुन्हा निर्माण होण्याचा धोका आहे.

मुंबईतील अनेक क्बलमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन होत नसल्याचा तक्रारी येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत थर्टी फर्स्ट डोळ्यापुढे ठेवून कोरोना संकट वाढू नये म्हणून हे कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.