…तर संजय राऊतांना ‘ मै नंगा हू’ म्हणत बसावं लागले; निलेश राणेंचा शिवसेनेवरही हल्लाबोल

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीच्या ईडी चौकशीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे. एका नोटीसला इतके घाबरले, मग संजय राऊतांना म्हणत बसावं लागेल ‘ मै नंगा हू’.असे ट्वीट निलेश राणेंनी केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांच्यासारखे लोक मर्दानगीची भाषा करतात, हे खूप हास्यास्पद वाटते.ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढले ते मैदानात लढाईची भाषा करतात. मैदानात आल्यानंतर त्यांना कळेल की लढाई म्हणजे काय असतं. लढाई सुरू झाल्यानंतर तुमची अवस्था पाहून म्हणावं लागेल, ‘ मै नंगा हू’.” संजय राऊत ईडीच्या एकाच नोटसला खूप घाबरले असल्याची टिका निलेश राणेंनी ट्विट करत केली आहे.

ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यलयाबाहेर भाजप प्रदेश कार्यालय अशी बॅनगरबाजी केली. यावरुनही निलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले “आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल”. देशा बाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे. असं ट्विट करत निलेश राणेंनी शिवसेनेवर टीकेची झोड उडवली.