sanjay-nirupam

संजय निरूपम(sanjay nirupam) म्हणाले की, संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचे म्हणत होते.आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. एनआयएने आता संजय राऊत (sanjay raut)यांनाच ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी.

    मुंबई : कॉंग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम (sanjay nirupam)यांनी एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे  यांच्या प्रकरणी शिवसेनेवर टीका केली आहे. निरुपम यांनी या प्रकरणी खासदार संजय राऊत (sanjay raut)उलटसुलट वक्तव्ये करत असल्याने त्यांची चौकशी का करत नाही असा प्रश्न केला आहे.

    राऊत यांची चौकशी करा
    निरूपम म्हणाले की, संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचे म्हणत होते.आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. एनआयएने आता संजय राऊत यांनाच ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी.

    निरुपम यांनी व्टिट करत मागणी केली आहे की, “संजय राऊत यांनी सांगितले की, ते सचिन वाझे यांना पोलिसांमध्ये परत घेण्याच्या विरोधात होते. पहिल्यांदा त्यांनी वाझे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचे म्हटले होते. संजय राऊत यांनी वाझे कोणत्या नेत्यांच्या खांद्यावर बसून पोलीस दलात परत आले, राष्ट्रीय तपास यंत्रणेने राऊत यांना उचलून चौकशी करुन त्यांच्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचावे, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.