नाही तर मीच सेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडतो; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

सध्या एसटी कर्मचारी आंदोलन, मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत या मुद्द्यांवरुन विरोधी पक्षनेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा नेते नितेश राणेंनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे(Nitesh Rane criticizes Shiv Sena).

    मुंबई : सध्या एसटी कर्मचारी आंदोलन, मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत या मुद्द्यांवरुन विरोधी पक्षनेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा नेते नितेश राणेंनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे(Nitesh Rane criticizes Shiv Sena).

    1993च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवले. आता त्यांचाच मुलगा 93 दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय. खरे तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो. अशी जहरी टीका केली आहे.

    993 साली हिंदू-मुसलमानांमध्ये दंगल झाली होती. या दंगलीचा दाखला देत नितेश राणेंनी ही टीका केली आहे. तत्कालिन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळात सध्या सत्तेत असलेल्या पक्षांवर कठोर टीका केली होती. आता त्यांचाच मुलगा उद्धव ठाकरे या पक्षातील नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे, असे नितेश राणे म्हणाले आहेत. यावर आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.