nitesh rane tweet

‘नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’ असे वाक्य लिहून रियाझ भाटीचे (Riyaz Bhati Photos With Uddhav Thackeray And Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचे जुने फोटो नितेश राणेंनी ट्विट(Tweet) केले आहेत. नवाब मलिकांना हेच म्हणायचे आहे का ? असा खोचक सवालही नितेश राणेंनी ट्विटमध्ये (Nitesh Rane Tweet)विचारला आहे.

    मुंबई: भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. रियाझ भाटीवरुन नवाब मलिकांनी प्रश्न विचारले आहेत. नितेश राणे यांनी नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत एक ट्विट(Nitesh Rane Reply To Nawab Malik) केले आहे. ‘नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’ असे वाक्य लिहून रियाझ भाटीचे (Riyaz Bhati Photos With Uddhav Thackeray And Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचे जुने फोटो नितेश राणेंनी ट्विट(Tweet) केले आहेत. नवाब मलिकांना हेच म्हणायचे आहे का ? असा खोचक सवालही नितेश राणेंनी ट्विटमध्ये विचारला आहे.


    नवाब मलिक म्हणाले होते की, आमचा तुम्हाला सवाल आहे की रियाझ भाटी कोण आहे. २९ ऑक्टोबरला रियाझ भाटी बनावट पासपोर्ट सोबत सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम संबंधाच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. रियाझ भाटी सर्व कार्यक्रमात तुमच्या सोबत का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करायचा नाही. त्यांच्या कार्यक्रमात जायचं असल्यास तपासणी केल्याशिवाय परवानगी मिळत नाही. रियाझ भाटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढले. रियाझ भाटीसोबत तुम्ही वसुलीचं काम केलं. या सगळ्या वक्तव्यानंतर नितेश राणेंनी ट्विट करत रियाझ भाटीसोबतचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो ट्विटवर शेअर केले आहेत.