शिवप्रसाद काय असतो, ते वैभव नाईकांना विचारा : नितेश राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला

या मुद्द्यावरून संजय राऊत यांची भाजपा आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. शिवप्रसाद काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकांना विचारावे. पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल, तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की!, असे ट्वीट करत नितेश राणेंनी संजय राऊतांना देखील या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.

    मुंबई – शिवसेना भवनासमोर दोनच दिवसांपूर्वी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. शिवसैनिक भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना भिडले आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. तशाच स्टाईलचा राडा आज कोकणातील सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

    या मुद्द्यावरून संजय राऊत यांची भाजपा आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. शिवप्रसाद काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकांना विचारावे. पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल, तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की!, असे ट्वीट करत नितेश राणेंनी संजय राऊतांना देखील या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.

    राणे बंधूंकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केले जात असताना त्यामध्ये नितेश राणेंच्या या नव्या ट्वीटची भर पडली आहे.