May God save Konkan from such fools Nitesh Rane criticizes Vinayak Raut

संतोष परब यांच्यावरील कथित जीवघेणा हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई हायकोर्टाकडून बुधवारीही निकाला येऊ शकला नाही. या प्रकरणी आता गुरुवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान,राणे यांना उद्यापर्यंत अटकेपासून दिलासा कायम असणार आहे. हायकोर्टाचे कामकाज सध्या दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सुरू आहे. तीन वाजता कोर्टाची वेळ संपल्यानंतर कामकाज थांबवण्यात आले. दरम्यान, राणेंच्या वकिलांकडून त्यांची बाजू मांडण्यात आली. यानंतर आता गुरुवारी दुपारी एक वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे(Nitesh Rane's pre-arrest bail hearing postponed).

  मुंबई : संतोष परब यांच्यावरील कथित जीवघेणा हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई हायकोर्टाकडून बुधवारीही निकाला येऊ शकला नाही. या प्रकरणी आता गुरुवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान,राणे यांना उद्यापर्यंत अटकेपासून दिलासा कायम असणार आहे. हायकोर्टाचे कामकाज सध्या दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सुरू आहे. तीन वाजता कोर्टाची वेळ संपल्यानंतर कामकाज थांबवण्यात आले. दरम्यान, राणेंच्या वकिलांकडून त्यांची बाजू मांडण्यात आली. यानंतर आता गुरुवारी दुपारी एक वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे(Nitesh Rane’s pre-arrest bail hearing postponed).

  राज्य सरकारने दिली होती ग्वाही

  या अटकपूर्व जामिनावर जोपर्यंत मुंबई हायकोर्टा आपला निकाल देत नाही तोपर्यंत राणे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कुठलीही कठोर कारवाई होणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. याची नोंद घेत हायकोर्टाने गुरुवारी दुपारी सुनावणी घेण्याच निश्चित केले आहे.

  युक्तिवाद पूर्ण

  दरम्यान, सुनावणीत राणे यांच्या वकिलांकडून अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तीवाद पूर्ण करण्यात आला. यावेळी त्यांनी हे प्रकरण निव्वळ राजकीय वैमन्यस्यातून उकरुन काढत राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. विधानभवनातील म्याव म्याव प्रकरणानंतर जुन्या प्रकरणावरुन त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केल्याचेही यावेळी राणेंच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले.

  कणकवली पोलिसांची ग्वाही

  राणेंना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून मिळालेला दिलासा कायम आहे. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अटक केली जाणार नाही, अशी ग्वाही कणकवली पोलिसांकडून मुंबई हायकोर्टात दिली आहे.परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले आमदार नितेश राणे आणि माजी जि. प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांनी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अ‍ॅड. शुभदा खोत यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तर विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी त्यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता. राणे हेच हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचा दावा त्यांनी केला होता.

  हे सुद्धा वाचा
  • 2022