केंद्रात ब्लॅकमेलींग करणारे सरकार असल्याने आरोप लावले तरी कोणताही मंत्री दोषी नसेल : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

'महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. पोलिसांनी जी किरीट सोमय्यांवर कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र सोमय्यांना पाठवला त्यात कायदा व सुव्यवस्थेची अडचण निर्माण होईल म्हणून इथे येवू नका असा सल्ला दिला.

  मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी येत्या काही दिवसांत काँग्रेसच्या  दोन मोठ्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत गौप्यस्फोट करू, असे भाकीत केले आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress state president Nana Patole) यांनी ‘केंद्रात ब्लॅकमेलींग करणारे सरकार असल्याचे सांगत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
   
  आरोप लावले तरी कोणताही मंत्री दोषी नसेल
  नाना पटोले यांनी म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याला काँग्रेस घाबरत नाही. आमच्या कोणत्याही मंत्र्यांवर त्यांनी आरोप लावले तरी कोणताही मंत्री दोषी नसेल त्यामुळे त्यांच्या इशाऱ्याला घाबरत नाही. ईडी आणि सीबीआयचा गैरवापर कसा केला जातो. हे सगळा देश बघत आहे. कर नाही त्याला डर कशाला, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे, ‘असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

  कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही राज्य सरकारची जबाबदारी
  ‘महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. पोलिसांनी जी किरीट सोमय्यांवर कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र सोमय्यांना पाठवला त्यात कायदा व सुव्यवस्थेची अडचण निर्माण होईल म्हणून इथे येवू नका असा सल्ला दिला. कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे,’ असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.