महत्त्वाची बातमी : आज कोणालाही दिलासा नाहीच, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक आणि पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा

सकाळी १०.४६ वाजल्यापासून दुपारी दुपारी ३.२६ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल्स मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल्स आपल्या निर्धारित स्थानकांवर थांबतील.

  मुंबई : देखभाल आणि दुरुस्तीच्या महत्त्वाच्या कामांसाठी मध्य, पश्चिम रेल्वेवर मुंबईतल्या उपनगरीय विभागात आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

  सकाळी १०.२५ वाजल्यापासून दुपारी ३.४४ वाजेपर्यंत

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल्स माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल्स आपल्या निर्धारित स्थानकांवर थांबतील. ठाण्याहून पुढे जलद लोकल्स मुलुंडपासून डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीराने पोहोचतील.

  सकाळी १०.४६ वाजल्यापासून दुपारी दुपारी ३.२६ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल्स मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल्स आपल्या निर्धारित स्थानकांवर थांबतील. अप जलद मार्गावरील लोकल्स माटुंग्याहून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. आपल्या निर्धारित वेळेपेक्षा त्या १५ मिनिटे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

  हार्बर मार्ग

  हार्बर मार्गावर सकाळी १०.१८ वाजल्यापासून ते ३.१६ वाजेपर्यंत सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर / वाशी साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल्स आणि सकाळी १०.४५ वाजल्यापासून दुपारी ३.४१ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूर / वाशी-सीएसएमटी करिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल्स रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- मानखुर्द दरम्यान विशेष लोकल्स चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्यांच्या वैध तिकिटांवर सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मेन मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

  पश्चिम मार्ग

  मरीन लाइन्स-माहीम दरम्यान जम्बो ब्लॉक

  मरीन लाइन्स-माहीम स्थानकांदरम्यान आज सकाळी १०.३५ वाजल्यापासून दुपारी ३.३५ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत डाऊन दिशेकडील सर्व धीम्या लोकल्स मरीन लाइन्स आणि माहीम जंक्शन स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येतील. तसेच प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्या कारणाने या लोकल्स महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधीत प्रवासी वांद्रे-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान उलट्या दिशेने प्रवास करू शकतात.

  या दरम्यान डाऊन दिशेकडील सर्व धीमी लोकल्स चर्चगेट आणि माहीम जंक्शन स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील तसेच लोअर परेल आणि माहीम जंक्शन स्थानकांवर दोनदा थांबविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेकडील काही उपनगरीय लोकल्स रद्द राहतील. ब्लॉक संबंधीची सविस्तर माहिती उपनगरीय स्थानकांतील सर्व स्टेशन मास्तर कार्यालयात उपलब्ध आहे.

  No one is relieved today megablock on all three railway lines today Get out of the house with a schedule and rain forecast before you leave