वानखेडेंविरोधात आता ‘नो ट्वीट्स’; नवाब मलिक यांची हायकोर्टात हमी

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सुरू असलेली आरोपांची मालिका आता काही काळापुरती स्थगित होणार आहे. हायकोर्टातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी मलिक यांनी हायकोर्टात दिली आहे('No tweets' against Wankhede now; Nawab Malik's guarantee in the High Court).

  मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सुरू असलेली आरोपांची मालिका आता काही काळापुरती स्थगित होणार आहे. हायकोर्टातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी मलिक यांनी हायकोर्टात दिली आहे(‘No tweets’ against Wankhede now; Nawab Malik’s guarantee in the High Court).

  यामुळे अखेर वानखेडे कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकलपीठाच्या निर्णयाला वानखेडेंकडून खंडपीठापुढे आव्हान देण्यात आले होते. आता या प्रकरणी 9 डिसेंबरला हायकोर्टात पुढील सुनावणी आहे.

  मलिक यांनी याबाबत कुठेही तक्रार का केली नाही? केवळ ट्विट करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात का?  हे सर्व निव्वळ प्रसिद्धीपोटी? की मीडिया ट्रायलसाठी? असे सवाल उपस्थित झालेत.

  वकिलांनी दिली लिखित हमी

  मलिक यांच्या वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, पुढील सुनावणीपर्यंत मलिक ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माध्यमातून करणार नाहीत. कोर्टाने सुनावल्यानंतर वकिलांनी तसे लिहून दिले आहे.

  अंत्यसंस्कारासाठी मुस्लीम, सरकारी दस्तावेजासाठी हिंदू?

  समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप मलिकांनी ट्वीटरवर केला होता. नंतर त्यांनी पत्रपरिषदेत वानखेडे आणि ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. वानखेडेचे गैरप्रकार मी गेले 55 दिवस उघड करत आहे. वानखेडे कुटुंबीयाची ओळखच दुहेरी असल्याचे मलिक यांनी म्हटले. वानखेडे कुटुंबीय वैयक्तिक जीवनात मुस्लिम राहिले. मात्र, अनुसूचित जातीचे फायदे मिळवण्यासाठी प्रमाणपत्रांवर हिंदू राहिले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले की, “आणखी एक फर्जीवाडा…अंतिम संस्कार करताना मुस्लिम आणि सरकारी दस्तावेजांसाठी हिंदू? धन्य आहेत दाऊद ज्ञानदेव.” असे ट्वीट केले होते.