एसटी संप मोडीत काढण्यासाठी जबरदस्त प्लान! कामावर येत नाही त्यांना घरी बसवणार; ST महामंडळाचा इशारा

संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरुच आहे. 1539 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे. आता जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, त्यांना घरीच पाठवणार, असेच संकेत एसटी महामंडळ प्रशासनाने दिले आहेत(Not coming to work will keep them at home; ST Corporation warning).

  मुंबई : संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरुच आहे. 1539 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे. आता जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, त्यांना घरीच पाठवणार, असेच संकेत एसटी महामंडळ प्रशासनाने दिले आहेत(Not coming to work will keep them at home; ST Corporation warning).

  दीड महिन्यांपासून राज्यभर एसटी कर्मचारी सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. मात्र, प्रवाशांचे होत असलेले हाल, एसटीचे होणारं नुकसान पाहता, आता एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यानुसार बडतर्फीची नोटीस पाठविण्यात येत आहे.

  बडतर्फीची कारवाई सुरूच

  येत्या काही दिवसांमध्ये कर्मचारी कामावर परत न आल्यास आणखी काही कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, अद्याप वेळ गेलेली नाही, असे संकेत देण्यात आले आहेत. मात्र जे संपावर कायम राहतील त्यांना घरीच पाठविले जाईल, असे बडतर्फीच्या कारवाईतून देण्यात येत आहेत.

  91 आगार संपामुळे बंदच

  महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील 250 आगारांपैकी 159 आगार सुरु झाले आहे. तर 91 आगार संपामुळे अजूनही बंद आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातील 16, मुंबई विभागातील 15, नागपूर 10, पुणे 9, नाशिक 22 आणि अमरावती विभागातील 19 असे राज्यभरातील 92 आगार अजूनही बंद आहे.