महापालिकेत शिवसेनेचा नाही तर काँग्रेसचा महापौर? स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान

यापूर्वी देखील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. काँग्रेस यंत्रणेने सर्व ताकद लागली तर मुंबई महापौर होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई : मुंबईत सध्या महापालिका निवडणुची रणधुमाळी पहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, आघाडीतील तिन्ही पक्षांमधून स्वबळाचीही भाषा येऊ लागलीय. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आगामी मुंबई महापौर काँग्रेसचाच असेल असं म्हणत दंड थोपटले आहेत.

यापूर्वी देखील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. काँग्रेस यंत्रणेने सर्व ताकद लागली तर मुंबई महापौर होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका आघाडीने एकत्र लढवल्या आणि चांगलं यशही मिळवलं. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हि तिन्ही पक्ष आघाडी म्हणून मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकाही एकत्र लढतील अशी चर्चा आहे.

मात्र, काँग्रेस नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेमुळे मुंबई महापालिका निवडणुकीची चुरस वाढणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून ही निवडणुक स्वबळावर लढण्याची तयारी देखील सुरु झाली असल्याचे दिसत आहे. इतकंच नाही तर महापौरही काँग्रेसचाच असेल असा निर्धारही नेत्यांनी व्यक्त केला आहे.