महालक्ष्मी देवीभक्तांना सूचना कडेकोट बंदोबस्त : सीसीटीव्हीची नजर

रात्री ११.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. मंदिरामध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. तसेच थर्मल स्कॅनर, मास्क, सुरक्षित अंतर ठेवल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

    मुंबई : देश विदेशातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान व मुंबईकरांचे आराध्यदैवत असलेल्या महालक्ष्मी (Mahalaxmi) देवीभक्तांना कळविण्यात येते की, राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट होत असून शासनाने नवीन निर्बंधावली तयार केलेली आहे.

    रात्री ११.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. मंदिरामध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. तसेच थर्मल स्कॅनर, मास्क, सुरक्षित अंतर ठेवल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

    दिनांक १३ जानेवारी पासून शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत असणार आहे, ह्याची भक्त मंडळींनी नोंद घेवून महालक्ष्मी मंदिर न्यासाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिराचे महाव्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांनी कळविले आहे.