
राज्यातील १५ डिसेंबरपासून शाळा सुरु होतील असं म्हटलं होतं. परंतू ओमायक्रॉनचे नवीन संकट उभे ठाकल्यामुळं सर्वच चिंतेत सापडले आहेत. या धरतीवर आता २३ तारखेपासून १ तारखेपर्यत ख्रिसमसची सुट्टी आहे, त्यामुळं १ जानेवारीपासूनच शाळा सुरु करा, या मागणीला जोर धरु लागला आहे. नवीन वर्षातच शाळा सुरु करा अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.
मुंबई : राज्यातील ग्रामीण व शहरी भागात काही ठिकाणी पहिलीपासून शाळा सुरु झाल्या असल्यातरी, ओमायक्रॉन नवीन संकटामुळं सर्वजण धास्तावले आहेत. त्यामुळं ओमायक्रॉनचे रुग्ण देशात अनेक ठिकाणी आढळले आहेत. या धरतीवर १५ डिसेंबरपासून शाळा सुरु करणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण सध्या ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटमुळं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शाळा सुरु करण्याबाबत मतमतांतर असल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे ग्रामीण भागात पहिलीपासून शाळा सुरु झाली असली तरी महत्वाच्या शहरांमधील पहिलीपासूनचे वर्ग अजूनही बंद आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन शुक्रवारी किंवा १५ तारखेऐवजी शाळा नवीन वर्षातच सुरु करा, अशी मागणी शिक्षक-पालकांकडून केली जातेय. मुंबई, पुण्यासारख्या शहरात १५ डिसेंबरपासून तर नाशिक, औरंगाबादेत उद्यापासून पहिली ते पाचवीच्या मुलांची शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. पण त्याविषयी अजूनही निर्णय झालेला नाही.
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून म्हणजे २३ डिसेंबर ते १ जानेवारी अशी नाताळची सुट्टी असते. त्यामुळे १५ तारखेला शाळा सुरु केल्यास आठवडाभरानंतर नाताळची सुट्टी लागेल. त्यामुळे नवीन वर्षातच शाळा सुरु करण्याची मागणी शिक्षक आणि पालकांनी केली आहे.
दरम्यान याआधी शिक्षणमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणं राज्यातील १५ डिसेंबरपासून शाळा सुरु होतील असं म्हटलं होतं. परंतू ओमायक्रॉनचे नवीन संकट उभे ठाकल्यामुळं सर्वच चिंतेत सापडले आहेत. या धरतीवर आता २३ तारखेपासून १ तारखेपर्यत ख्रिसमसची सुट्टी आहे, त्यामुळं १ जानेवारीपासूनच शाळा सुरु करा, या मागणीला जोर धरु लागला आहे. नवीन वर्षातच शाळा सुरु करा अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.