best ac bus

बेस्टने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भाऊचा धक्का दरम्यान प्रवर्तित होणारा वातानुकूलित बसमार्ग क्र.ए-४१ शनिवार, १ जानेवारी २०२२ पासून सुरू केली आहे. हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रिझर्व बँक, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, गेट वे ऑफ इंडिया मार्गे कुलाबा बस स्थानक पर्यंत विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे या बसमधून ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया आदीचे दर्शन या वातानुकूल बसमधून होणार आहे.

    मुंबई : आता मुंबईकराणा होणार वातानुकूल बसमधून मुंबईचे दर्शन, कारण बेस्टने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भाऊचा धक्का दरम्यान प्रवर्तित होणारा वातानुकूलित बसमार्ग क्र.ए-४१ शनिवार, १ जानेवारी २०२२ पासून सुरू केली आहे. हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रिझर्व बँक, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, गेट वे ऑफ इंडिया मार्गे कुलाबा बस स्थानक पर्यंत विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे या बसमधून ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया आदीचे दर्शन या वातानुकूल बसमधून होणार आहे. पहिल्यांदाच बेस्टन हा या मार्गावर वातानुकुल बस सुरू केली आहे, त्यामुळे याला मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

    दरम्यान या मार्गावरून जाताना एक वेगळ्या मुंबईचे दर्शन होते, तसेच मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मरीन ड्राईव्ह वरील फेसळणारा समुद्र आपण बसची हवा खात पाहू शकतो. तसेच मुंबईची आणि देशाची शान म्हणून ओळखले जाते ते गेट वे ऑफ इंडियाचे दर्शन, तसेच ऐतिहासिक ताज हॉटेलचे दर्शन, भाऊचा धक्का वरील माशांच्या बाझार आदी स्थळाचे दर्शन बसमध्ये बसून होवू शकते.

    त्यामुळे मुंबईत या मार्गावर पहिल्यांदाच वातूनुकुल बस सुरू केली असल्याने याला चांगला प्रतिसाद मिळत असून, जास्तीत जास्त मुंबईकरानी याचा अनुभव घ्यावा असं बेस्टकडून आवाहन करण्यात आले आहे.