राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बोनस – अजित पवार

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला योग्य हमीभाव आणि मदतीसाठी बोनस दिला जाईल अशी शासनाची भूमिका आहे मात्र शेतकऱ्यांना बोनस देताना शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे भले होत आहे. त्यांचीच दुकानदारी चालत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिली.

    मुंबई : विदर्भातील धान उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत असून अतिवृष्टीमुळे आणि महागाईमुळे त्याचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने शेतकऱ्यांना बोनस दिला होता. या वर्षीसुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा अशी मागणी आमदार आशीष जयस्वाल, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली.

    व्यापाऱ्यांची दुकानदारी नको – पवार

    विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला योग्य हमीभाव आणि मदतीसाठी बोनस दिला जाईल अशी शासनाची भूमिका आहे मात्र शेतकऱ्यांना बोनस देताना शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे भले होत आहे. त्यांचीच दुकानदारी चालत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिली. शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम प्रति एकर याप्रमाणे जमा करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य आणि थेट बोनस मिळेल अशी ग्वाही अजित पवार यांनी आज सभागृहात दिली.

    दरम्यान अधिवेशनचा आजचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सभागृहातील कमकाज तहकूब न होता सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.