उध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ? : आचार्य तुषार भोसलेची टीका

राज्यभरात याविषयी गदारोळ सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांकडून यावर अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. याबाबत भाजप आध्यात्मिक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर टीका केली आहे.

    मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदाय निर्बंधासह पायी वारीची मागणी करतो आहे. राज्य सरकारने ही मागणी अमान्य करत बसणे वारीचा निर्णय दिला आहे. तरीदेखील असंख्य सर्वसामान्य वारकरी, अनेक वारकरी वारकरी संघटना पायी वारीसाठी आग्रही आहेत.

    राज्यभरात याविषयी गदारोळ सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांकडून यावर अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. याबाबत भाजप आध्यात्मिक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर टीका केली आहे.

    विठ्ठलच मान्य नाही ते वारीची भूमिका घेणार नाही

    काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते खा.संजय राऊत एका कार्यक्रमात म्हणाले होते की, “महाराष्ट्रात दोनच विठ्ठल, एक शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे”. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत आचार्य तुषार भोसले म्हणाले की,”ज्या शिवसेनेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला पंढरपूरचा विठ्ठलच मान्य नाही ते पंढरीच्या वारी विषयी भूमिका घेऊ शकत नाही यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

    Now that the entire Shiv Sena including Uddhav Thackeray has become Pawar how will they look Warkari Criticism of Acharya Tushar Bhosale