आता मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांच्या नावांनी ओळखता येणार, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

आता सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता मंत्र्यांच्या बंगल्याची नावे ही गडकिल्ल्यांच्या नावाने यापुढे ओळखण्यात येतील. राज्याच्या सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या नावांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या २० कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांना आता गडकिल्ल्यांचे नाव देणारा आदेश जारी करण्यात आला आहे.

  मुंबई : मंत्री आदित्य ठाकरेंचा मुक्काम रायगडावर किंवा मंत्री जितेंद्र आव्हाडांचा राहणार शिवगडावर असं वाचलं किंवा ऐकलं तर धक्का बसेल ना, पण ह खरे आहे. आता सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता मंत्र्यांच्या बंगल्याची नावे ही गडकिल्ल्यांच्या नावाने यापुढे ओळखण्यात येतील. राज्याच्या सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या नावांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या २० कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांना आता गडकिल्ल्यांचे नाव देणारा आदेश जारी करण्यात आला आहे. यानंतर मंत्री उदय सामंत यांनी टिव्ट करत माहिती दिली आहे.

  दरम्यान, राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याचे बदलेले नाव आता शिवगड असणार आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बंगल्याचे नाव रायगड असेल. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याचे नाव सिंहगड आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याचे नाव रत्नसिंधू असेल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचे नाव पावनगड तर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या बंगल्याचे नाव सिद्धगड असेल. तर कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्याचे नाव हे राजगड असेल, त्यामुळं आता मंत्र्यांच्या बंगल्यावर जातोय असं म्हणतेवेळी मी रायगडावर चाललोय असं म्हणता येणार आहे.

  याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला गड किल्ल्यांची नावे देण्याची मागणी केली होती. ही मागणी राज्य सरकारपुढे विचाराधीन होती. त्यानुसार सार्वजनिक आणि बांधकाम विभागाला मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे पत्रकही जारी करण्यात आले आहे, हे पत्रक आणि आपल्या बंगल्याचे नाव याची माहिती देणारे टिव्ट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

  आता मंत्र्यांच्या बंगल्याची नावे या गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखता येणार

  अ ६ – रायगड – आदित्य ठाकरे

  अ ३ – शिवगड, जितेंद्र आव्हाड

  अ ४ – राजगड, दादा भुसे

  अ ५ – प्रतापगड, केसी पाडवी

  अ ९ – लोहगड –

  बी ४ – पावनगड – वर्ष गायकवाड

  बी ५ – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ

  बी ६ – सिद्धगड – यशोमती ठाकूर

  बी ७ – पन्हाळगड – सुनील केदार

  बी १ – सिंहगड – विजय वड्डेटीवार

  बी २ – रत्नसिंधू, –  उदय सामंत

  बी ३ – जंजिरा, अमित देशमुख

  क ५ – अजिंक्यतारा – अनिल परब

  क ६ – प्रचितगड, बाळासाहेब पाटील

  क ७ – जयगड

  क ८ – विशाळगड

  क १ – सुवर्णगड, गुलाबराव पाटील

  क २ – ब्रह्मगिरी, संदीपान भुमरे

  क ३ – पुरंदर

  क ४ – शिवालय