भावना गवळींमागे ‘ईडी’चा ससेमिरा; चौकशी तर होणारच, सईद खानला अटक

30 ऑगस्ट रोजी ईडीने वाशीम जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या गवळी यांच्या संस्थांमध्ये झडती घेतली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर 100 कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला आहे.

    मुंबई (Mumbai) : वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थां भोवतीचा सक्तवसुली संचालनालयाने (The Directorate of Recovery) (ईडी) (ED) फास आवळला आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच (Mahila Utkarsh Pratishthan) बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने ही अटक केली.

    अटक बेकायदेशीर असल्याचा दावा
    सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा खान यांच्या वकीलांनी केला आहे. सईद खान यांना अटक केल्यानंतर त्यांचे वकील इंद्रापल सिंह यांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला. खान हे ईडीकडून देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याबरोबरच तपासात सहकार्य करत असतानाही ही अटक करण्यात आल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. या अटकेमुळे गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आली. त्याच कंपनीमध्ये गवळी या निर्देशक म्हणजेच संचालकपदी होत्या.

    100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
    30 ऑगस्ट रोजी ईडीने वाशीम जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या गवळी यांच्या संस्थांमध्ये झडती घेतली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर 100 कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला आहे. या धाड सत्रानंतर गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलेली. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधित दोन व्यक्तींना ईडीने समन्स पाठवले होते. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले होते.