आता फुकट मिळणार नाही, दहा रुपये द्यावे लागणार; ऑक्टोंबरपासून शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द

कोरोना निर्बंधामुळे लाभार्थ्यांना मोफत दिली जाणारी राज्य सरकारची  शिवभोजन थाली आता १ ऑक्टोबरपासून पुन्हा १० रुपयांना मिळणार आहे(Shiv Bhojan Thali Scheme).  राज्य सरकारने राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने सुरु केलेल्या “ब्रेक द चेन” या प्रक्रिये अंतर्गत  टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे.

    मुंबई : कोरोना निर्बंधामुळे लाभार्थ्यांना मोफत दिली जाणारी राज्य सरकारची  शिवभोजन थाली आता १ ऑक्टोबरपासून पुन्हा १० रुपयांना मिळणार आहे(Shiv Bhojan Thali Scheme).  राज्य सरकारने राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने सुरु केलेल्या “ब्रेक द चेन” या प्रक्रिये अंतर्गत  टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे.

    राज्यातील विविध समाजघटकांसाठी राज्य सरकारने निर्बंध लागू करताना मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिल पासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत  मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती.  मात्र आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणा आल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द केला आहे.  त्यामुळे १ ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी पुन्हा १० रुपयांना मिळणार आहे.

    कोरोना काळात लाखो मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार होता. कोरोनामुळे लाभार्थ्यांना ही थाळी मोफत दिली जात होती.  मात्र ३० सप्टेंबरपर्यंत थाळी मोफत असेल नंतर त्याचे दर १० रुपये असे पूर्वीप्रमाणे करण्याचा शासनादेश आज जारी करण्यात आला आहे. तसेच पार्सल सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते.  या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली होती.