OBC ministers together for reservation, in the role of Maratha minister; Narendra Patil expressed grief

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात पडसाद उमटताना दिसत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. सरकारमधील ओबीसी समाजातील मंत्री एकजूट झाले आहेत. याच मुद्याकडे लक्ष वेधत माजी आमदार तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा मंत्र्यांच्या भूमिकेबद्दल खंत व्यक्त केली आहे.

    मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात पडसाद उमटताना दिसत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. सरकारमधील ओबीसी समाजातील मंत्री एकजूट झाले आहेत. याच मुद्याकडे लक्ष वेधत माजी आमदार तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा मंत्र्यांच्या भूमिकेबद्दल खंत व्यक्त केली आहे.

    ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर येताच ओबीसी समाजाचे सर्व मंत्री एकत्र येतात, मात्र मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात, खरे तर हेच मराठा समाजाचे मोठे दुर्दैव आहे. समाजाला डावलून राजकारणाला उराशी धरणाऱ्या विकृतीला मराठा बांधव नक्कीच उत्तर देतील, अशा शब्दात पाटील यांनी मराठा मंत्र्यांवर टीका केली आहे.