मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा नाशिक पोलिसांनी ऑनलाइन उपस्थितीत नोंदविला जबाब

केंद्रीय मंत्री नारायण राणे(Union Minister Narayan Rane) यांच्यावर नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नारायण राणे शनिवारी ऑनलाइन उपस्थितीत जबाब नोंदविण्यात आला आहे. यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त संजय बारकुंड उपस्थित होते. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणे यांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Union Minister Narayan Rane) यांच्यावर नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नारायण राणे शनिवारी ऑनलाइन उपस्थितीत जबाब नोंदविण्यात आला आहे. यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त संजय बारकुंड उपस्थित होते. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणे यांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

    २५ सप्टेंबरला ऑनलाइन जबाब

    नाशिकचे शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांचे पथक राणे यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी येथे गेले होते. दरम्यान, राणे यांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता. त्यानंतर राणे यांना उच्च न्यायालयाने अटकेची कारवाई करण्यापासून दिलासा दिला होता. त्यामुळे जबाब नोंदवण्यासाठी शहर पोलिसांनी राणे यांना नोटीस पाठविली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे २ सप्टेंबरला नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार होते. मात्र, गणेशोत्सवामुळे त्यांच्या वकीलांनी तारीख वाढवून घेतली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणेंच्या वकिलांशी बोलून २५ सप्टेंबरला ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले होते.

    गुन्हे शाखेकडून मंत्री राणे यांचा ऑनलाईन जबाब

    या प्रकरणात उच्च न्यायालयाने राणे यांचा जामीन मंजूर करताना १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत. त्यामुळे राणे यांचा शहर पोलिसांना जबाब नोंदवता आला नाही. त्यानुसार शनिवारी पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंत्री राणे यांचा ऑनलाईन जबाब नोंदवला. यामध्ये प्रश्नोत्तरात पोलिसांनी झालेल्या घटनेबाबत प्रश्न विचाराले तर, राणे यांनी त्यास उत्तरे दिली.