The renaming of schools after cities and airports; All Mumbai Municipal Corporation schools will be renamed

कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने येत्या १५ डिसेंबरपासून इयत्ता १ ली पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यात ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक विषाणूचे रुग्ण आढळल्याने शाळा सुरु करण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सद्या तरी शाळा सुरु करण्याचा निर्णय कायम असला तरी येत्या तीन - चार दिवसांत आढावा घेऊनच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली(Omacron's risk increased! Question marks about starting schools in Mumbai; BMC will take a decision based on the situation).

    मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने येत्या १५ डिसेंबरपासून इयत्ता १ ली पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यात ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक विषाणूचे रुग्ण आढळल्याने शाळा सुरु करण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सद्या तरी शाळा सुरु करण्याचा निर्णय कायम असला तरी येत्या तीन – चार दिवसांत आढावा घेऊनच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली(Omacron’s risk increased! Question marks about starting schools in Mumbai; BMC will take a decision based on the situation).

    कोरोनाच्या संकटामुळे मागील दीड वर्षापासून राज्यातील शाळा बंद होत्या. मात्र कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने १ डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या. मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचे मुंबई महापालिकेने जाहिर केले होते. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु केल्या जाणार होत्या. शिक्षण विभागाने त्याची संपूर्ण तयारीही केली आहे. दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजणार म्हणून पालकही आनंदीत होते. मात्र जगभरात धुमाकूळ घालणा-य़ा घातक ओमायक्रॉनने महाराष्ट्रातही शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

    राज्यभऱात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आठवर गेली आहे. संक्रमित व इतर देशातून आलेल्यांची तपासणी केली जात असून पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. धोका वाढत असल्याची स्थिती असल्याने पालकांमध्येही मुलांना शाळेत पाठवण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका व राज्य सरकार याबाबत आढावा घेणार आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी येत्या तीन – चार दिवसांत बैठक घेऊन एकूण स्थितीचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतरच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या तरी शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याच्यादृष्टीने तयारी केली आहे. दरम्यान नव्या व्हेरियंटचा धोका वाढत गेल्यास शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.