मुंबईकरांची चिंता वाढली – धारावीमध्ये ओमायक्रॉनने पसरले हातपाय, मौलवीचा रिपोर्ट ओमायक्रॉन पॉझिटीव्ह

धारावीमध्ये (Dharavi) ओमायक्रॉनने (Omicron Patient In dharavi) शिरकाव केला आहे. परदेशातून आलेल्या एका मौलवीचा (Maulavi Report Omicron Positive)रिपोर्ट हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.

    मुंबई : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन मुंबईत (Omicron Patient Found In Mumbai) हातपाय पसरत आहे. धारावीमध्ये (Dharavi) ओमायक्रॉनने (Omicron Patient In dharavi) शिरकाव केला आहे. परदेशातून आलेल्या एका मौलवीचा (Maulavi Report Omicron Positive)रिपोर्ट हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.

    डोंबिवलीमधील आढळलेला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण निगेटिव्ह आढळल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला होता. पण आता परदेशातून मुंबईतील धारावीत आलेल्या एका नागरिकाचा कोरोना रिपॉर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला असून ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

    पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेली व्यक्ती मौलवी आहे. मुंबई आल्यानंतर ते धारावी येथील एका मशिदीत वास्तव्यास होते. सुरुवातील या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. या मौलवीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या मौलावीला तातडीने क्वारंटाईन करण्यात आले आहे.