कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची लागली ब्रम्हानंदी टाळी आणि घात झाला अन् जे जे इस्पितळातून आरोपी पळाला

गेल्या पंधरा दिवसांपासून हा आरोपी जे जे रूग्णालयाच्या हृदयरोग विभागात दाखल होता. त्याच्यावर ॲन्जिओग्राफी आणि ॲन्जिओप्लास्टी या दोन्ही शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या शैलेश झिराडकरने ड्युटीवरील पोलिसांचा विश्‍वास संपादन केला होता. तो रोज स्वतः उठून पाणी पिण्यसाठी अथवा टॉयलेटमध्ये जात असे.

    मुंबई : बलात्काराच्या आरोपात कैदेत असलेल्या शैलेश झिराडकर नावाच्या एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देवून मोठ्या कौश्यल्याने जे जे हॉस्पिटलमधून धूम ठोकली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. शैलेश झिराडकरचे वय ४३ वर्ष असून तो ऑर्थररोड कारागृहातील कैदी होता.

    ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती

    गेल्या पंधरा दिवसांपासून हा आरोपी जे जे रूग्णालयाच्या हृदयरोग विभागात दाखल होता. त्याच्यावर ॲन्जिओग्राफी आणि ॲन्जिओप्लास्टी या दोन्ही शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या शैलेश झिराडकरने ड्युटीवरील पोलिसांचा विश्‍वास संपादन केला होता. तो रोज स्वतः उठून पाणी पिण्यसाठी अथवा टॉयलेटमध्ये जात असे.

    पोलीस झोपल्याचा फायदा उचलला

    मात्र आज त्याने याच गोष्टीचा फायदा उचलला. सकाळी सात वाजता पोलीस झोपलेले आहेत हे पाहून त्याने वॉर्डच्या बाहेर येत थेट जेजे हॉस्पिटलच्या बाहेर धूम ठोकली. अंगात त्याने निळा टी शर्ट घातला असल्याने खाली ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डसच्या लक्षात ही बाब आली नाही. आता या आरोपीच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या दोन पोलिस शिपायांवर नोकरीतून निलंबित होण्याचे संकट कोसळले आहे.