रविवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, घेणार अमित शाह यांची भेट

महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. एकीकडे शिवसेनेचे नेते महाविकास आघाडीवर उघड उघड नारजी व्यक्त करत आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांमुळे दुखावलेल्या मित्र पक्षांना सावरण्यासाठी संजय राऊत भाजप सोबत पंगा घेत आहेत. त्यातच आता रविवारी दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    सध्या महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यात खूप तणावपूर्ण संबंध सुरू आहेत. ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. अशा वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यात रविवारी (२ सप्टेंबर) दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे, या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादी कारवाया, नक्षलग्रस्त भागांचा विकास, शहरी नक्षलवाद यासारख्या मुद्द्यांवर बैठक बोलावली आहे. या बैठकीला नक्षलग्रस्त राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीत सहभागी होण्यासाठी जाणार आहेत.

    असं असलं तरी लोकांच्या नजरा या गोष्टीकडे लागलेल्या आहेत की, ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे आपल्या शिष्टमंडळासह दिल्लीला गेले होते त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्याच प्रमाणे यावेळी देखील मुख्यमंत्री अमित शाह यांच्यासोबत एकांतात बैठक घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागंल आहे. आणि जर ही बैठक झाली तर हा भाजप आणि शिवसेनेतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे का? अशा चर्चा रंगल्या आहेत.