corona in wardha

राज्यशासनाने दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे व निर्धारित केलेल्या दराप्रमाणे खासगी लॅब कोरोना चाचणीचे दर आकारत नाहीत. उलट अतिरिक्त शुल्क आकारून रुग्णांची फसवणूक करत असल्याचे निर्दशनास आले  आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या संबंधित विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीची आढावा बैठक घेतली. भायखळा, येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात ही बैठक पार पडली.

मुंबई : कोरोनाबाबत पालिकेने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दर अकारणाऱ्या खासगी लॅबना नोटीस बाजवावी. मात्र संबंधितांनी त्यानंतरही उल्लंघन केल्यास त्यांची मान्यता रद्द करावी, असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. यामुळे अवाजवी दर आकारून रुग्णांची लूटमार करणाऱ्या खासगी लॅब आता पालिकेच्या रडारवर आल्या आहेत.

राज्यशासनाने दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे व निर्धारित केलेल्या दराप्रमाणे खासगी लॅब कोरोना चाचणीचे दर आकारत नाहीत. उलट अतिरिक्त शुल्क आकारून रुग्णांची फसवणूक करत असल्याचे निर्दशनास आले  आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या संबंधित विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीची आढावा बैठक घेतली. भायखळा, येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात ही बैठक पार पडली. कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे, उप आरोग्य अधिकारी टिपरे तसेच विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी  उपस्थित होते.

दरम्यान, अतिरिक्त दर आकारणाऱ्या खासगी  लॅबला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन संबंधित लॅबची तपासणी करावी, असे निर्देश महापौरांनी दिले. या तपासणीत अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या लॅबला नोटीस बजावून समज द्यावी. नोटीस बजाविल्यानंतरही  नियमांचे उल्लंघन करीत असणाऱ्या खासगी लॅबची मान्यता रद्द करावी, असे आदेश महापौरांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे पालिकेच्या सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नातून कोरोनावर  नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे सर्वांनी यापुढे दक्ष राहून, या अवाजवी दरावर नियंत्रण मिळवावे, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या आहेत.