फडणवीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर, जाणून घ्या नेमकं काय होतं या भेटीमागचं कारण

राज्यात मिनी विधानसभा निवडणुका म्हणजेच मोठ्या शहरांच्या महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर आहे. त्यापार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खास निमंत्रण दिले होते. त्यानुसार फडणवीस यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज हे नव्या घरात राहायला आल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. शिवाय पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. भाजप आणि मनसे दरम्यानच्या युतीच्या चर्चा मधल्या काळात जोर धरत होत्या. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

    आगामी महापालिका निवडणुका किंवा विधानसभा निवडणुकांसाठी मनसे आणि भाजपा यांच्यामध्ये युती होणार का? याची तुफान चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. ही चर्चा दोन्ही पक्षांकडून जशी पूर्णपणे स्वीकारण्यात आलेली नाही, तशीच ती पूर्णपणे नाकारण्यात देखील आलेली नाही. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

    राज्यात मिनी विधानसभा निवडणुका म्हणजेच मोठ्या शहरांच्या महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर आहे. त्यापार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खास निमंत्रण दिले होते. त्यानुसार फडणवीस यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत.

    देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज हे नव्या घरात राहायला आल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. शिवाय पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. भाजप आणि मनसे दरम्यानच्या युतीच्या चर्चा मधल्या काळात जोर धरत होत्या. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

    भाजपा आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार यावर ही भेट म्हणजे शिक्कामोर्तब असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून या भेटीविषयी जाहीर चर्चा करण्यात आलेली नसली, तरी या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.